चीनला झटका, जर्मन कंपनी कोट्यवधी डॉलरचा उद्योग हिंदुस्थानमध्ये हलवणार

3683

एकीकडे कोरोनाचा आकडा वाढत असताना एक दिलासादायक बातमी आली आहे. जर्मनीची जगप्रसिद्ध बूट निर्यात कंपनी ‘कासा एव्हर जिम्ब’ने (Casa Everz Gmbh) आपला लाखो डॉलरचा उद्योग हिंदुस्थानला हलवण्याचा निर्धार केला आहे. याबाबत हिंदुस्थानची बूट निर्यात करणारी कंपनी ‘आय ट्रॅक’ आणि ‘कासा एव्हर जिम्ब’ कंपनीत महत्वाचा करार झाला आहे.

दोन्ही कंपन्या मिळून नवीन ब्रँडची स्थापना करणार आहेत. हिंदुस्थानमध्ये बनणाऱ्या ब्रँडचे नाव ‘वॉन वॅल्स जर्मनी- 5 जोन (Von wellx Germany- 5 zone) असे असणार आहे. दोन्ही कंपन्यात झालेल्या करारामुळे जवळपास 10 हजार लोजांना रोजगार मिळेल आणि कोटयवधी डॉलरचा व्यवसाय मिळेल.

images-1

जर्मनीची जगप्रसिद्ध बूट निर्यात कंपनी ‘कासा एव्हर जिम्ब’ने (Casa Everz Gmbh)आपला उद्योग हिंदुस्थानात आणण्याचे पक्के केले आहे. उत्तर प्रदेश सरकार कंपनीला सहकार्य करण्यास उत्सुक असून आग्रा येथे हा प्लांट लागणार आहे. निर्यातीवर या कंपनीचा जोर असणार असून यामुळे हिंदुस्थानची निर्यातही वाढेल. तसेच विदेशी चलनही यामुळे देशाच्या तिजोरीत जमा होईल.

india-vs-china

‘कासा एव्हर जिम्ब’ (Casa Everz Gmbh) कंपनी आणि ‘आय ट्रॅक’ कंपनीत याबाबत करार झाला आहे. करारानुसार ‘आय ट्रॅक’ कंपनी कंपनी या जर्मन कंपनीचा माल बनवणार आहे, तर क्वालिटी कंट्रोल जर्मन कंपनीकडे असणार आहे. आय ट्रॅक कंपनीचे मालक हा प्लांट आग्रा येथे लावण्यास उत्सुक आहेत.

याबाबत उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री चौधरी उदय भान सिंह यांनी सांगितले की, जर्मन कंपनी चीनमधून आपला उद्योग हिंदुस्थानमध्ये आणणार आहे ही आनंदाची गोष्ट आहे. हा प्लांट आग्रा येथे लागणार असून सरकार सहकार्याला तयार आहे. ‘आय ट्रॅक’ कंपनीचे सीईओ आशिष जैन यांनी या करारास दुजोरा दिला असून हिंदुस्थानसाठी चीनमधील उद्योग आपल्या देशात आणण्याची ही मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या