बिकिनी घालू देणार नसाल तर स्पर्धेवर बहिष्कार, महिला व्हॉलीबॉल खेळाडूंनी केलं जाहीर

volleyball-stars

जर्मनीच्या बीच व्हॉलीबॉल स्टार्स कार्ला बोर्गर आणि जूलिया सुड यांनी जाहीर केले आहे की पुढल्या महिन्यात कतार येथे होणाऱ्या टूर्नामेंटवर त्यांनी बहिष्कार घातला आहे. या खेळाडूंचं म्हणणं आहे की कतार हा एकमेव असा देश आहे जिथं खेळाडूंना खेळाच्या कोर्टवर बिकिनी घालण्यास मनाई आहे.

एका जर्मन रेडिओ स्टेशनवर झालेल्या मुलाखतीवेळी कार्ला म्हणाली की, ‘आम्ही खेळाच्या मैदानात आमचं कर्तव्य पार पाडण्यासाठी जात असतो. मात्र आम्हाला आमच्या प्रोफेशनला आवश्यक असे कपडे परिधान करण्याची परवानगी दिली जात नाही. हा एकमेव अशा देश आणि ही एकमेव अशी स्पर्धा आहे जिथं सरकार आम्हाला आमचा खेळ कसा खेळायचा आणि कोणते कपडे घालायचे हे शिकवते. आम्ही याची निंदा कर आहोत.’

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या व्हॉलीबॉल खेळाडूंना सांगण्यात आले आहे की त्यांनी खेळताना शर्ट आणि लाँग ट्राउझर्स परिधान करणे आवश्यक आहे. जूलिया आणि कार्ला यांनी स्पष्ट केलं आहे की त्या कतार प्रशासनाच्या या सूचना पाळू शकणार नाहीत आणि त्यामुळेच यास्पर्धेवर त्यांनी बहिष्कार घातला आहे.

कार्ला पुढे म्हणाली की, कोणत्याही देशाप्रमाणे आपण तिथं राहण्यास तयार आहोत मात्र दोहा मध्ये प्रचंड उकाडा असतो त्यामुळे बिकिनी घालून खेळण्यास आमचं प्राधान्य आहे. दोहामध्ये मार्चमध्येच तापमान 30 ते 35 अंश सेल्सिअस पर्यंत जाते. त्यानंतर तापमान अधिक वाढते.

तर जूलिया म्हणाली की, कतार मधील नियमांसदर्भात मला फारसे काही वाटत नाही. 2019 मध्ये दोहा येथे वर्ल्ड एथलेटिक्स स्पर्धा झाली होती. त्यावेळी महिलांना त्यांच्या प्रोफेशनप्रमाणेच वस्त्र परिधान करण्याची परवानगी मिळाली होती.

इस्लामिक रुढीवादी देशांमध्ये महिलांना वस्त्र परिधान करण्यास अनेक बंधनं आहेत. पर्यटनामुळे हळूहळू इथला समाज देखील मल्टीकल्चरल होत आहे. मात्र पहिल्यांदाच दोहा येथे महिलांचा वर्ल्ड टूर इव्हेंट होत आहे. त्यामुळे हा विषय अधिक चर्चेत आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या