न्यायालय परिसरात पती-पत्नीकडील नातेवाईकांची फिल्मीस्टाईल हाणामारी

45

संतोष भोसले । गेवराई

पती -पत्नीचा चालू असलेला वाद न्यायालयात मिटवण्यासाठी आल्यानंतर नातेवाईकांच्या झालेल्या भांडणाचे रुपांतर फिल्मीस्टाईल हाणामारीमध्ये झाले. या हाणामारीमध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी दुपारी गेवराई न्यायालयाच्या आवारात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, हिना जब्बार पठाण (वय -२८ रा. चकलांबा ता. गेवराई) हिचा विवाह १९ एप्रिल २००९ रोजी जब्बार अजीज पठाण (वय -३३ रा. जाटवळ ता. शिरुरकासार जि. बीड) यांच्या सोबत झाला होता. परंतु या दोघांत काही कालावधी नंतर खटके उडू लागले. महिलने गेवराई न्यायालयात विविध कलमा नुसार पोटगी व इतर बाबी विरुद्ध तक्रार केली होती.

गुरुवारी दुपारी दिडच्या सुमारास न्यायालयाच्या परिसरात दोन्हीकडील नातेवाईक जमा झाले व आपसात तडजोड करुन हा वाद मिटवण्याचे सुरू असतानाच वाद चिघळला व त्याचे पर्यावसन भांडणात झाले. मारहाण करणारे चार चाकी वाहनातून पसार झाले आहेत. या फिल्मीस्टाईल प्रकाराने न्यायालय परिसरात काही काळ प्रचंड गोंधळ उडाला. या प्रकरणी मुलांकडील मंडळी येथील पोलीस ठाण्यात गेले असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.

आपली प्रतिक्रिया द्या