Video – मृतदेहांची हेळसांड, मानेला रश्शी बांधून जमिनीवरून फरफटत नेले

1110
प्रातिनिधिक

पश्चिम बंगालमधील एका रुग्णालयात मृतदेहांची भयंकर हेळसांड होत असल्याचे समोर आले आहे. रुग्णालयातील शवागरातील कुजलेले मृतदेह मानेला रश्शी बांधून रुग्णालयातील कर्मचारी जमिनीवरून फरफटत नेताना एका व्हिडीओत दिसून येत आहे. या घटनेचा धक्का दायक व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यपाल जगदीप धनकर यांनी या घटनेचा निषेध केला आहे. कोलकात्यातील एका रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. दरम्यान कोलकाता पोलिसांनी ते मृतदेह कोरोनाच्या रुग्णांचे नसल्याचा दावा केला आहे.

कोलकाता रुग्णालयातील हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत कर्मचारी मृतदेह खेचून जाताना दिसत आहेत. त्यानंतर या मृतदेहांना स्मशानभुमीत जाळल्यानंतर परिसरात दुर्गंधी पसरली होती. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी याबाबत आंदोलन केल्यानंतर हे मृतदेह निर्जन स्थळी नेऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणावरून पश्चिम बंगाल सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. तसेच या प्रकरणी पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी चौकशी अहवाल मागवला आहे.

हे प्रकरण तापलेले असतानाच पश्चिम बंगालमधील बिरभूम जिल्ह्यातल्या एका रुग्णालयातील शवागृहातले एअर कंडिशन बंद असल्यामुळे तेथील 13 मृतदेह गेल्या अनेक दिवसांपासून कुजत पडले आहेत. या मृतदेहांमधून दुर्गंधी येत असल्यामुळे रुग्णालयात राहणे देखील तेथील रुग्णांना अशक्य झाले आहे. त्यामुळे आज रुग्णांच्या नातेवाईकांनी प्रशासनाविरोधात आंदोलन केलं.

आपली प्रतिक्रिया द्या