संशयाची पाल चुकचुकली, खून करून पत्नीला शेतातच गाडली; असा झाला थरकाप उडवणाऱ्या हत्याकांडाचा खुलासा

गाझियाबादमध्ये थरकाम उडवणारी घटना घडली आहे. बायकोचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन पत्नीचा गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर त्याने मृतदेह घरापासून 150 मीटर दूर शेतात खड्डा खोदून शेतात पुरले होते. आरोपीने ज्याठिकाणी तिला पुरले होते, तिथे बाजरीचे पिक घेऊन तिथे तारांचे कुंपण घातले. पोलिसांना संशय न देण्यासाठी भोजपूर पोलीस स्थानकात जाऊन बायको बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. याप्रकरणी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.

फजलगड येथील रहिवासी दिनेश कुमारचे लग्न चौदा वर्षांपूर्वी मेरठच्या रोहटा गावातील सलारपूर येथील अंजूसोबत झाले होते. तो पत्नी अंजू देवी, मुलगा हर्ष आणि मुलगी रिया सोबत राहत होता. मात्र त्याला बायकोच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे त्यांच्यात बऱ्याचदा खटके उडत होते. दरम्यान दिनेश 30 जानेवारी रोजी भोजपूर ठाण्यात पोहोचला आणि पोलिसांकडे पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. बराच तपास करूनही त्यांची पत्नी सापडली नाही. पोलिसांनी अंजूदेवी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.

पोलिसांनी गुरूवारी दिनेश कुमार यांना भोजपुर पोलीस स्थानकात बोलावले आणि त्याची चौकशी केली. आधी त्याने पोलीसांना चकमा दिला, मात्र त्याची कसून चौकशी केली असता त्याने सगळं काही खरं सांगितले. दिनेश कुमारने पोलिसांना सांगितले की, 25 जानेवारीच्या सकाळी साडेतीन वाजता अंजूला उठवले आणि भाजी आणायला चाललो आहे. सामान लिहू दे, जशी ती घराच्या बाहेर आली त्यावेळी तिचा त्याने गळा दाबला. जोपर्यंत तिचा प्राण जात नाही तोपर्यंत तिचा गळा दाबून ठेवला. हत्येनंतर तिला शेतात लपवले. दिनेशने सांगितले की 27 जानेवारीला ज्याठिकाणी तिचा मृतदेह पुरला , तिथे त्याने बाजरीचे पिक लावले. मुलांनी आई कुठे गेली विचारले असता ती लवकर परत येईल असे सांगितले.

हत्या केल्यानंतर दिनेशने महिलेचा मृतदेह शेतात लपवला होता. दिवसभर तो तिथेच होता. त्यानंतर 26 जानेवारीच्या रात्री त्याने मृतदेह खांद्यावर घेऊन घरापासून 150 किमी अंतरावर असलेल्या शेतात पुरला. त्यासाठी दिनेशने शेतात चार फुट लांब आणि खोल खड्डा खोदला. त्यानंतर मृतदेहाला खड्ड्यात पुरले. खड्ड्यात त्याने 35 किलो मीठ घातले जेणेकरुम जेणेकरून मृत शरीर लवकर वितळेल.