
गझलनवाज भीमराव पांचाळे यांची ‘शब्द-सुरांची भावयात्रा’ ही हृदयस्पर्शी संगीत यात्रा शनिवारी, 18 मार्च सायंकाळी 7 वाजता होणार आहे. वरळी येथील नेहरू सेंटरच्या तिकीट खिडकीवर या कार्यक्रमाच्या प्रवेशिका उपलब्ध आहेत.
गेल्या वर्षी या मैफलीला 50 वर्षे पूर्ण झाली. अर्धशतकाचे निमित्त साधून नेहरू सेंटरने या भावयात्रेचे आयोजन केले आहे. भीमराव पांचाळे यांची कन्या डॉ. भाग्यश्री पांचाळे यासुद्धा या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. अनेक पुरस्कारांचे मानकरी असलेले भीमराव पांचाळे यानिमित्ताने रसिकांच्या भेटीला येणार आहेत. गिरीश पाठक, सुधाकर अंबुसकर, संदीप कपूर, अब्रार अहमद यांचा यात वादक कलाकार म्हणून सहभाग असणार आहे. रवींद्र वाडकर हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत.