गयानी इन्फेंटिनो पुन्हा फिफा अध्यक्ष

2016 साली सॅप ब्लेटर यांच्या जागी फिफा अध्यक्ष म्हणून निवड झालेल्या गियानी इन्फेंटिनो यांची सलग तिसऱयांदा त्याच पदावर निवड करण्यात आली आहे. आता ते 2027 पर्यंत फिफा अध्यक्ष असतील. फिफाच्या नियमानुसार कोणतीही व्यक्ती सलग तीन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा अध्यक्ष म्हणून निवडले जाऊ शकत नाही. मात्र हा नियम त्या अध्यक्षांनी तिन्ही कार्यकाळ पूर्ण केलेले असतील, तेव्हाच लागू होऊ शकतो. डिसेंबरमध्ये इन्फेंटिनो यांची पहिली तीन वर्षे पूर्ण कार्यकाळाच्या रूपात मोजले गेले नव्हते. त्यामुळे त्यांनी 2031 पर्यंत पदावर राहण्याची तयारी आधीपासूनच केलेली दिसत आहे. आगामी 2026 च्या फिफा वर्ल्डकपमध्ये एकूण 48 संघ खेळणार असून उभय संघांमध्ये 104 सामने खेळले जातील. यंदाच्या वर्ल्डकपमधे 64 सामनेच खेळले गेले होते. हा वर्ल्डकप चार संघांच्या 12 गटांमध्ये खेळविला जाणार आहे.