गिफ्ट ऑफ लव्ह; खरटमल दाम्पत्याचे मुंबईत चित्र प्रदर्शन

सोलापूरचे प्रसिद्ध चित्रकार वर्षा आणि रामचंद्र या खरटमल दाम्पत्याच्या चित्रांचे प्रदर्शनगिफ्ट ऑफ लव्हया शीर्षकाखाली मुंबईतील कुलाबा आर्ट गॅलरीत भरले आहे. 10 मार्चपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी 11 ते 7 पर्यंत खुले आहे.

या प्रदर्शनात एकूण 35 चित्रे प्रदर्शित केली आहेत. रामचंद्र खरटमल हे नॅशनल ऍवॉर्ड विनर चित्रकार आहेत. त्यांची आजपर्यंत देशांतर्गत व देशाबाहेर अनेक ठिकाणी चित्र प्रदर्शने झालेली आहेत. त्यांची चित्रे अनेक प्रसिद्धी व्यक्ती, कला संग्रह, म्युझियममध्ये संग्रहित आहेत.

गोधडी व ब्युटी चित्रमालिकेतील चित्रे या प्रदर्शनात प्रदर्शित केली आहेत. वर्षा खरटमल यादेखील अनेक पारितोषिकप्राप्त चित्रकर्ती आहेत. त्यांची पण चित्रे अनेक ठिकाणी प्रसिद्ध व्यक्ती, कलारसिक, संग्रहालयामध्ये संग्रहित आहेत. त्यांचीसुद्धा देश-विदेशात चित्र प्रदर्शने झाली आहेत.

हिंदुस्थानी चित्र परंपरांवर आधारित त्यांची चित्रशैली आहे त्यांच्या चित्रांचे विषय प्रामुख्याने मराठी स्त्र्ााrवर आधारित आहेत. मराठी स्त्रीचा साजशृंगार हा मोहित करणारा आहे. अशा या दांपत्याचे चित्र प्रदर्शन कुलाबा आर्ट गॅलरीत जाऊन जरूर पाहावे. ही संधी कुलाबा आर्ट गॅलरीचे सबनीस दाम्पत्य आणि आर्ट ऍम्बेसीचे प्रशांत वेदक यांनी मुंबईकरांसाठी उपलब्ध करून दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या