चौपाटीवर लाईफ गार्डला काँग्रेस नगरसेककाची मारहाण

316

गणेश विसर्जनादरम्यान 13 सप्टेंबर रोजी गिरगाव चौपाटीवर काँग्रेस नगरसेवकाने 25 कार्यकर्त्यांसह चौपाटीवर कर्तव्य बजावणाऱया लाईफ गार्डला मारहाण केल्याचा आरोप गिरगाव चौपाटी लाईफ गार्ड असोसिएशनने मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत आज केला.

गिरगाव चौपाटीवर गणपतीचे विसर्जन होताना चौपाटीवर लाईफ गार्ड आपले कर्तव्य बजावत होते. त्यावेळी अल्टमाऊंट मित्रमंडळातील कार्यकर्ते नगरसेवक सुनील नरसाळे यांच्याबरोबर विसर्जनस्थळी आले. यावेळी नरसाळे यांच्या कार्यकर्त्यांनी कोणतेही कारण न देता लाईफ गार्डला मारहाण सुरू केल्याचा आरोप लाईफ गार्डचे कंत्राटदार रूपेश कोठारी यांनी केला. या प्रकरणी ग्रँट रोड येथील डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात नरसाळे व त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले. या घटनेमुळे लाईफ गार्डच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे मारहाण करणाऱ्यांना पोलिसांनी पाठीशी न घालता कारवाई करावी अन्यथा जोरदार आंदोलन करू असा इशाराही असोसिएशनच्या वतीने देण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या