आरोग्यशिक्षण मंत्री पिस्तुल घेऊन फिरतात!

सामना ऑनलाईन । जळगाव

राज्याचे जलसंपदा आणि आरोग्यशिक्षण मंत्री गिरीश महाजन दिवसाढवळ्या पिस्तुल घेऊन फिरतात. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था उत्तम असल्याचा दावा करत असले तरी त्यांचेच मंत्रिमंडळातील आणि भाजपमधील सहकारी असलेले गिरीश महाजन पिस्तुल घेऊन फिरत आहेत.

पिस्तुल घेऊन सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्याप्रकरणी काही पत्रकारांनी थेट गिरीश महाजन यांनाच प्रश्न विचारले. या प्रश्नांना उत्तर देताना महाजन यांनी आपण लोकांना घाबरवण्यासाठी पिस्तुल घेऊन फिरत नव्हतो, असा दावा केला आहे.

मी सरकारी गाडीतून जात असताना जवळच्या गावातून बिबट्या आला, बिबट्या आला असे ओरडत गावकरी रस्त्यावर आले. त्यावेळी निवडक सरकारी अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत जवळच्या रानात कोणी प्राणी खरच लपला आहे का? हे तपासण्यासाठी मी पिस्तुल घेऊन फिरत होतो; असे स्पष्टीकरण गिरीश महाजन यांनी दिले.

महाजन आणि कॅमेरा

गिरीश महाजन पिस्तुल घेऊन कारमधून उतरले त्यावेळी स्थानिक पत्रकार कॅमेरा घेऊन त्यांचा पाठलाग करू लागले. कॅमेऱ्यात आपण दिसत असल्याचे लक्षात आल्यावर आपले पिस्तुल दिसेल याची खबरदारी घेत गिरीश महाजन यांनी थोडा वेळ रानात तपासणी केली. नंतर सरकारी गाडीत येऊन बसले आणि कडेकोट बंदोबस्तात निघून गेले. याआधीही पत्रकारांचे कॅमेरे आसपास असल्याचे लक्षात आल्यावर बुलेटवरुन फिरणे, बैलगाडीतून एखाद्या ठिकाणाची पाहणी करणे असे स्टंट गिरीश महाजन यांनी केले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या