Faशन Paशन… हिंदुस्थानी स्टाईल

गिरीश ओक

तुमची आवडती फॅशन – मनाला जे आवडेल, जे पटेल ती माझ्यासाठी फॅशन.

फॅशन म्हणजे वागण्यातून बोलण्यातून व्यक्त होण्याआधी जी व्यक्त होते ती.

व्यक्तिगत आयुष्यात कशा प्रकारचे कपडे घालण्यास प्राधान्य देता? –जिथे जायचंय तिथले काम आणि हवामान यानुसार माझं मन सांगेल त्या प्रकारचे कपडे घालण्यास प्राधान्य देतो.

फॅशन म्हणजे केवळ कपडे की?- नाही. व्यक्तिमत्त्वात भर.

आवडती हेअरस्टाइल? – आत्ता आहे तीच.

फॅशन जुनी की नवी? – फॅशन कधीच नवी राहू शकत नाही. आली की झाली जुनी.

आवडता रंग? – गर्द हिरवा आंब्याच्या पानांचा.

तुमच्या माणसांना तुमची कोणती फॅशन आवडते

आवडून घेतात बिचारे… मग त्यांच्या बरोबर जायचं असलं की, मी त्यांच्या मनाप्रमाणे कपडे घालतो.

स्ट्रीट शॉपिंग आवडते का?- खूप.

 कोणत्या गोष्टीवर जास्त खर्च करता ? – मी हव्या त्याच गोष्टींवर खर्च करतो. कुठल्याच नाही.

ज्वेलरीमध्ये काय आवडते? – आत्ता माझ्या अंगावर आहे तेच. हातात कडं (चांदीचं) गळ्यात साखळी (बक्षिसांच्या पैशांतून घेतलेली) डाव्या कानात बाळी.

आवडता ब्रॅण्डशक्यतोवर हिंदुस्थानी.

फॅशन फॉलो कशी करता?- मन सांगतं तशी फॅशन फॉलो करतो.

 फॅशनबाबत अपडेट राहण्यासाठी?- मनाशी प्रामाणिक राहतो.

ब्युटी सिक्रेटब्युटीचं सिक्रेट खरं तर मनात आहे, शरीरात नाही. मन आणि शरीर प्रसन्न, स्वस्थ ठेवणे. लौकिकदृष्टय़ा कुरूप माणसाचं मन प्रसन्न असेल तर तो अतिशय सुंदर दिसतो आणि याच्या उलट….आणि सुंदरता ही बघणाऱयाच्या डोळ्यांत असते, शरीरात ऍनाटॉमी.

गोविंद कवींनी तर म्हटलंय…

नव्या तनूचे नव्या शक्तिचे पंख मला फुटणार

मृत्यू म्हणजे वसंत माझा मजवरती फुलणार

सुंदर मी होणार!

टॅटू काढायला आवडेल का?-

काढलेले आहेत, पण या व्यवसायामुळे जास्त नाही काढता येत.

तुमच्या बॅगेत हमखास आढळणाऱया तीन गोष्टी

तीननं काय होतंय!

फिटनेससाठीनियमित व्यायाम करतो, पण तो घरीच.