मित्राच्या वाढदिवासाच्या पार्टीतून परतणाऱ्या तरुणीवर चालत्या कारमध्ये बलात्कार

महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. हाथरस बलात्काराच्या घटनेनंतर हाथरसमध्येच एका चार वर्षांच्या मुलीवर बलात्काराची घटना घडली आहे. तसेच देशभरात अशा घटनांचे प्रमाण वाढल्याने महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीहून घरी परतणाऱ्या तरुणीवर चालत्या कारमध्ये बलात्कार करण्यात आल्याची घटना पंजाबमध्ये घडली आहे.

पंजाबच्या लुधियानामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. मित्राच्या वाढदिवस साजरा करून पार्टीतून घरी परतणाऱ्या तरुणीला दोन मित्रांनी जबरदस्तीने कारमध्ये ओढले. त्यानंतर चालत्या कारमध्ये तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला सोडून ते पळून गेले.

पीडित तरुणीने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आपल्याला जबरदस्तीने कारमध्ये ओढून बलात्कार करणारे आपले मित्र असून ते खासगी हॉटेलमध्ये काम करत असल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. एका मित्राने वाढदिवसानिमित्त ठेवलेल्या पार्टीत आपल्याला बोलावले होते.वाढदिवसा साजरा केल्यानंतर पार्टीतून परतत असताना त्या दोघांनी आपल्याला कारमध्ये ओढल्याचे तरुणीने सांगितले.

लुधियानातील सराभानगर परिसरात तरुणीला कारमध्ये ओढल्यानंतर एकजण गाडी चालवत होता. तर चालत्या कारमध्ये दुसऱ्याने आपल्यावर बलात्कार केला. त्यानंतर दुसऱ्याने बलात्कार केल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर आपल्याला कारमधून उतरवून ते पळून गेल्याचे तिने सांगितले.

पोलिसांनी तरुणीची तक्रार नोंदवली असून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्या दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांची कारही जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या