CAA विरोधातील सभेत तरुणीकडून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा

1911
women name amulya chant pakistan zindabad in anti caa rally bengluru

बेंगळूरूमध्ये CAA विरोधात सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत एका तरुणीने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. त्यामुळे चांगलाच गदारोळ झाला. या सभेला एमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसेही हजर होते. त्यांनी या तरुणीला रोखले. तसेच या घटनेचा निषेधही केला.

बेंगळूरूमध्ये CAA, NCR आणि NPR विरोधात संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला खासदार ओवेसी यांनी संबोधन केले. त्यांचे भाषण झाल्यानंतर अमुल्या या तरुणीने सभेत हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. नंतर पाकिस्तान जिंदाबादच्याही घोषणा दिला. तेव्हा ओवेसी यांनी धाव घेत अमुल्याकडून माईक खेचण्याचा प्रयत्न केला. परंतु ती ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. सभेच्या आयोजकांनीही तिला अडवण्याचा प्रयत्न केला. नंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.

या प्रकरणी खासदार ओवेसी यांनी या घटनेचा निषेध केला. “आयोजकांनी या तरुणीला आंमत्रण नाही द्यायला पहैजे. मला हे आधीच माहित असतं तर मी आलोच नसतो. आम्ही हिंदुस्थानी असून आमच्या शत्रू राष्ट्राला कधीच पाठिंना नव्हता.” हिंदुस्थानला वाचणे हे आमचे उद्दिष्ट असल्याचे ओवेसी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या