लोकलमधून पडून डोंबिवलीच्या तरुणीचा मृत्यू

5191

गर्दीने खचाखच भरलेल्या लोकलमधून पडून एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चार्मी पसाद असे तरुणीचे नाव असून ती डोंबिवलीची रहिवासी होती.

चार्मीने डोंबिवलीहून सकाळी 8 वाजून 53 मिनिटांची फास्ट गाडी पकडली. तेव्हा गाडीला खूप गर्दी होती. चार्मीने कसेबसे गाडीत चढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ती गाडीच्या दरवाजातच उभी होती. पुढे कोपरला आल्यावर गर्दीमुळे तिचा तोल सुटला आणि चालत्या गाडीतून ती रेल्वे रुळावर पडली. त्यात चार्मीच्या डोक्याला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली. तिला जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

आपली प्रतिक्रिया द्या