तरुणीने खाल्ला वटवाघूळ, त्यामुळेच पसरला कोरोना व्हायरस?

2019

चीनमध्ये सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. आतापर्यंत या व्हायरसमुळे 26 जणांचा बळी गेला असून 830 जणांना त्याची बाधा झाली आहे. हा रोग चीनमधून इतर देशातही पसरण्याची शक्यता आहे. मात्र हा कोरोना व्हायरस आला कुठून याची सध्या जगभरात चर्चा सुरू असून शास्त्रज्ञ त्याचे मूळ शोधण्याचे प्रयत्न करत आहेत.

याच दरम्यान चीनमध्ये सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात एक तरुणी वटवाघूळ खाताना दिसत आहेत. याच तरुणीमुळेच कोरोना व्हायरस पसरला असल्याचा दावा या व्हिडीओतून करण्यात आला आहे. या व्हिडीओत किती तथ्य आहे ते अद्याप समजलेले नाही. मात्र चीनमध्ये मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ पसरला आहे. या व्हिडीओमधील तरुणीबाबतही अद्याप काहीच माहिती मिळालेली नाही.

कोरोना व्हायरस हा आता चीनमधून इतर देशातही पसरत आहे. अमेरिकेतही या रोगाचे संक्रमण झालेला एक रुग्ण आढळला आहे. त्याचप्रमाणे मुंबईतही या रोगाचे दोन संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या