बलात्कारी बापाच्या तावडीतून सुटून नराधमाच्या हाती सापडली, अल्पवयीन मुलीवर 28 दिवस अत्याचार

rape
प्रातिनिधिक फोटो

बलात्कारी बापाच्या तावडीतून सुटून पळ काढणाऱ्या अल्पवयीन मुलीला 28 दिवस डांबून ठेवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार राजस्थानमधील जोधपूर येथे घडला आहे. 15 वर्षीय पीडित मुलीच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी बलात्कारी बापाला बेड्या ठोकल्या आहेत. ‘इंडिया टूडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

पीडित मुलगी आपली नसल्याची शंका बलात्कारी बापाला होती. त्यामुळे ती 13 वर्षाची झाल्यापासून तो तिच्यावर बलात्कार करत होता. तसेच याची कुठे वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकीही देत होता. यामुळे पीडिता आपल्या काका-काकूंच्या घरी आजोबांसह रहात होती. मात्र तिचे काका-काकूही तिच्यावर अत्याचार करत होते.

वडिलांकडून होणारा शारिरीक छळ आणि काका-काकूंकडून होणारा मानसिक छळ यामुळे पीडितेच्या आजोबांनी गावातच तिला वेगळे घर बांधून दिले होते. आजोबा रोज तिला भेटायलाही जात होते. मात्र तिच्या काकांनी एका नराधमाला तिच्याकडे पाठवून 28 दिवस डांबून ठेवले आणि लैंगिक अत्याचार केले. रोजच होणाऱ्या अत्याचारामुळे पीडिता घर सोडून आजोबांकडे आली. इथेही तिच्या वडिलांची तिच्यावर पुन्हा बलात्कार केला.

पीडितेची अवस्था बिकट झाल्याने आजोबांनी तिला घेऊन पोलीस स्थानक गाठले. येथे पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि समूपदेशनानंतर तिने आपल्यावर झालेल्या अत्याचारांचा पाढा वाचला. वडील गेल्या दोन वर्षापासून आपल्यावर बलात्कार करत असल्याचे पीडितेने सांगितले.

पीडितेच्या तक्रारीनंतर तिच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आल्याचे, एसीपी मांगिलाल राठोड यांनी सांगितले. तसेच पीडितेवर उपचार सुरू असल्याचेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या