
झारखंडच्या एका तरुणीचं लग्न हा हजारीबाग परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. या तरुणीचं बिहारची राजधानी असलेल्या पाटण्यात लग्न झालं. पोलिसांनी हे लग्न लावून दिलं असून तिचा नवरा हा झारखंडमधल्याच बराडीचा रहिवासी आहे. अमर कुमार असं तरुणाचं नाव असून तरुणीचं नाव ऋतू आहे. अमर हा ऋतूच्या घरी वरचेवर येत जात होता. ऋतूच्या आईने घेतलेलं कर्ज परत करावं यासाठी तो तिच्यावर दबाव टाकत होता.
वरचेवर घरी येणारा अमर हळूहळू ऋतूला आवडायला लागला. अमरही तिच्या प्रेमात पडला आणि दोघांनी यापुढील संपूर्ण आयुष्य एकमेकांसोबत घालवण्याच्या आणाभाका घेतल्या. लग्नाला होत असलेल्या विरोधामुळे अमर आणि ऋतू झारखंडमधून पळून बिहारमध्ये येऊन राहायला लागले होते. जवळपास सहा महिने ते पाटण्यातील फुलवारी भागात राहात होते. दोन दिवसांपूर्वी अचानक अमरने ऋतूशी लग्न करण्यास नकार दिला. यामुळे घाबरलेल्या ऋतूने पोलिसांत धाव घेतली आणि त्यांना सगळा प्रकार सांगितला. पोलिसांत अमरविरोधात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अमरला शोधून पोलीस ठाण्यात आणला. पोलिसांनी अमरला नीट समजावलं ज्यानंतरत तो लग्नासाठी तयार झाला. यानंतर पोलिसांनी या दोघांना शिवमंदिरात नेऊन दोघांचे लग्न लावून दिले. लग्नानंतर हे जोडपं पुन्हा झारखंडला परतलं आहे.