अल्पवयीन मुलीला शोधण्यात हलगर्जीपणा; अकोल्यातील दोन पोलीस अधिकारी निलंबित

688
sad-girl

अल्पवयीन मुलीच्या तपासात हलगर्जीपणा केल्याच्या प्रकरणात अकोला शहरातील सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी भानुप्रताप मडावी आणि प्रणीता कराडे यांना निलंबित करण्यात आल्याची तसेच पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांची बदली करण्यात आल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत केली. महिला व मुलींविषयक गुह्यांच्या तपासात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही गृहमंत्र्यांनी दिला. अल्पवयीन मुलगी हरवल्याची नोंद मुलीच्या पालकांनी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात नोंदविली होती. या प्रकरणात तेथील तपास अधिकाऱ्यांनी गतीने तपास केला नाही. मुलीच्या काळजीमुळे पालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर उच्च न्यायालयाने तपासातील दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त करून कडक शब्दांत ताशेरे ओढले. या प्रकरणी देशमुख यांनी तातडीने विभागाच्या अपर मुख्य सचिवांना बोलावून चर्चा केली. या प्रकरणात तातडीने कठोर कारवाई करण्याचा निर्णय देशमुख यांनी घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या