आईला मारतात म्हणून मुलीने केली वडिलांची हत्या

प्रातिनिधिक फोटो

दारू पिऊन वडील आईला मारहाण करतात म्हणून एका 16 वर्षाच्या मुलीने वडिलांच्या डोक्यात कपडे धुवायच्या धोक्याने वार करत त्यांची हत्या केली आहे. मध्य प्रदेशमधील भोपाळ शहरात ही घटना घडली आहे. मुलीने वडिलांची हत्या केल्यानंतर 100 नंबरवर फोन करत पोलिसांना कळवले.

बुधवारी ती मुलगी व तिची आई मोठ्या मुलाच्या लग्नाची चर्चा करत बसले होते. त्यावेळी तिथे मुलीचे वडिल आले व त्यांनी दारूसाठी पैसे मागितले. आईने पैसे नाहीत असे सांगितल्यानंतर त्यांनी तिला मारहाण करायला सुरुवात केली. मुलीने सुरुवातीला त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र वडिल थांबत नसल्याने ती वैतागली व जवळच पडलेल्या धोक्याने तिने वडिलांवर हल्ला केला. जोपर्यंत वडिल मरत नाही तोपर्यंत ती त्यांच्या डोक्यात वार करत राहिली.

वडिल मेल्याची खात्री झाल्यानंतर तिने 100 नंबरवर फोन करून पोलिसांना तिच्या कृत्याबाबत कळवले व तिला अटक करा अशी मागणी केली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थली धाव घेत तिला अटक केली व त्यानंतर तिची सुधारगृहात रवानगी केली.

आपली प्रतिक्रिया द्या