बलात्काराला विरोध केला म्हणून 14 वर्षांच्या मुलीला जाळले, वेदनेने तडफडत झाला मृत्यू

fire

बलात्काराला विरोध केला म्हणून एका मुलीला ठार मारण्यात आलं आहे. 14 वर्षांच्या या मुलीला 30 जून रोजी पेटवून देण्यात आलं होतं. एक दिवस या मुलीने वेदनेने तडफडत काढला. बुधवारी तिची प्राणजोत मालवली. हा भयंकर प्रकार छत्तीसगडमधील मुंगेली जिल्ह्यातल्या एका गावात घडला आहे. बबलू भास्कर असं तिची हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.

ही मुलगी घरात एकटी आहे हे माहिती असल्याने बबलू मंगळवारी रात्री तिच्या घरात घुसला होता. त्याने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, मात्र या मुलीने त्याचा कडाडून विरोध केला. यामुळे भडकलेल्या बबलूने तिच्यावर रॉकेल ओतलं आणि पेटवून दिलं. ज्वाळांनी वेढलेल्या या मुलीने घराबाहेर पळ काढला, तिच्या आरडाओरड्यामुळे शेजारचे बाहेर आले होते. त्यांनीच तिला लागलेली आग विझवली आणि रुग्णालयात दाखल केलं होतं. ही मुलगी गंभीररित्या भाजली होती आणि तिची प्रकृती खालावली होती. बुधवारी रात्री तिचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूनंतर बबलूविरोधात पोक्सो, हत्या आणि अन्य कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या