‘मुच्छड अंकल’ ने केलं! 4 वर्षांच्या बलात्कार पीडित मुलीच्या वर्णनावरून आरोपी अटकेत

877

गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात 45 वर्षांच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने 4 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याचं उघड झालं आहे. ही घटना रविवारी घडली होती. पीडित मुलीच्या आईवडीलांनी नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पीडित मुलगी ही खेळत असताना आरोपीने तिला आमीष दाखवून घरी बोलावलं होतं. तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. मुलगी जेव्हा घरी आली तेव्हा तिच्या आईला तिच्या गुप्तांगाला सूज आल्याचे दिसलं. तिला आईने काय झालं असं विचारलं असता तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. तिने शेजारी राहणाऱ्या ‘मुच्छड अंकल’ने केल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार तिच्या आईवडीलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

पोलिसांन आरोपीविरूद्ध कलम 376 अंतर्गत तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून घटनेच्याच रात्री आरोपीला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीची कोरोना चाचणी झाल्यानंतर आरोपीला अधिकृतरित्या अटक करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या