ही दोस्ती तुटायची नाय…एकीला कुटुंबीय ओरडले; दोन मैत्रिणी घरातून पळाल्या…

आतापर्यंत मैत्रीची अनेक घटना घडल्या आहेत. मैत्री करणे सोपे असते पण ती निभावणे कठीण असते, असे म्हणतात. पण मैत्रीसाठी काहीही… असे म्हणणारे आणि मैत्री निभावणारेही काही मित्र असतात. अशीच एका मैत्रीची घटना शाजजहांपूरमध्य घडली आहे. त्यांच्या मैत्रीची कहाणी ऐकून पोलीसही आश्चर्यचकीत झाले आहेत.

एका मैत्रीणीला तिच्या घरच्यांनी फटकारल्यामुळे दुसरी मैत्रीणही तिच्यासोबच घरातून पळाली होती. पोलिसांनी त्यांचा शोध घेतल्यावर दोस्तीची ही घटना उघडकीस आली आहे. आपली बहीण बेपत्ता असल्याची तक्रार एका तरुणाने केली होती. तिचा शोध घेण्याची विनंती त्याने पोलिसांना केली. या मुलीसोबत तिची मैत्रीणही बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्या दोघी 20 नोव्हेंबरपासून बेपत्ता होत्या. 22 नोव्हेंबरला त्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. त्या दोघी एकत्र असणार, असा संशय पोलिसांना आला. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी पथक स्थापन केले.  सर्व्हिलान्सच्या मदतीने त्यांचे लोकेशन शोधण्यात आले. ते लखनऊ असल्याचे समजले. लखनऊला पोलीस पथक पोहचले. मात्र, त्यांचा मोबाईल बंद असल्याने त्यांचा ठावठिकाणा मिळाला नाही.

पुन्हा त्यांचे लोकेशन शोधले असता उन्नाव असल्याचे समजले. पोलीस पथक उन्नावमध्ये आले आणि लोकेशन शोधून त्यांचा पाठलाग करत राहिले आणि  या दोन मुलींना बनारसमधून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्यांना शाहजहांपूरमध्ये आणले आणि त्यांची कसून चौकशी केली.

काही कारणाने कुटुंबीयांशी भांडण झाल्याने कटुंबीयांनी आपल्या मैत्रीणीला फटकारले. त्यामुळे तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला. आमची घट्ट मैत्री असल्याने मैत्रिणीला एकटे सोडयचे नाही, असे ठरवून आपणही तिच्यासोबत घराबाहेर पडल्याचे एकीने सांगितले. या दोघींच्या जबाबाने आणि त्यांची ही मैत्री पाहून पोलिसांनाही आश्चर्य वाटले. याबाबत आणखी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

आपली प्रतिक्रिया द्या