इथे प्रेयसी बाळंत झाली, तिथे प्रियकर तिच्या आईसोबत पळाला!!

प्रेमात फसवणूक झाली की खूप दुःख होतं. अशी फसवणूक करणारी व्यक्ती जवळची असेल, तर या त्रासाला काहीच सीमा नसते. असाच काहीसा प्रकार एका तरुणीसोबत झाला आहे.

ही घटना इंग्लंड येथे घडली आहे. येथे राहणाऱ्या जेस अल्ड्रीज या 24 वर्षांच्या तरुणीचे रायन शेल्टन (29) या तरुणाशी प्रेमसंबंध होते. या नात्यातून त्यांना एक मूलही आहे. याच नात्यात जेस दुसऱ्यांदा गर्भवती राहिली आणि तिने 28 जानेवारी रोजी बाळाला जन्म दिला.

पण, या नात्याला जोडून अजून एक नातं आकार घेत होतं, ज्याची कल्पना जेसला अजिबातच नव्हती. जेसची आई जॉर्जिना (48) ही देखील रायनच्या प्रेमात पडली होती. रायन जेव्हा जेव्हा जेसला भेटायला घरी येत असे, तेव्हा जॉर्जिना त्याच्याशी फ्लर्ट करत असे.

आधी ही गोष्ट जेसने मनावर घेतली नाही. पण, ज्या दिवशी तिच्या दुसऱ्या बाळाचा जन्म झाला, त्याच दिवशी रायनने तिला मेसेज पाठवून हे नातं तोडत असल्याचं सांगितलं.

जेस चक्रावली. तिला यामागचा अर्थ कळेना. पण, थोड्याच वेळात तिला या प्रकाराचा उलगडा झाला. तिचा प्रियकर तिच्याच आईसोबत फरार झाला आणि त्यांनी दुसरीकडे घर घेऊन घरोबा थाटला असल्याची माहितीही तिला मिळाली. या प्रकाराने जेसला दुःख झालं आहे. दुसरीकडे तिची आई आणि प्रियकर यांनी सोशल मीडियावर आपल्या नात्याची कबुली दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या