मैत्रीण: नसतेस घरी तू जेव्हा…

<< अवधूत गुप्ते >>

नसतेस घरी तू जेव्हा

 तुझी मैत्रीणमाझी बायको गिरीजा

तिचा पॉझिटिव्ह पॉइंट ती मला ओळखते आणि ओळखून आहे.

निगेटिव्ह पॉइंट ती खूप समजूतदार आहे. माझ्याशी कधीही वाद घालत नाही.

तिच्यातली आवडणारी गोष्ट ती दुसऱ्याचं ऐकून घेते.

तिच्याकडून मिळालेले आतापर्यंतचे बेस्ट गिफ्ट माझी दोन मुलं.

तिच्याकडून काय शिकलात? – जगातला प्रत्येक माणूस सुखी होण्यासाठी धडपडत असतो, परंतु मिळालेल्या सुखामध्ये समाधानी राहणं जास्त महत्त्वाचं आहे हे मला तिच्याकडून शिकायला मिळालं.

एकमेकांसाठी वेळ देता का ? – हो. आम्ही एकमेकांना शंभर टक्के वेळ देतो.

तिची आवडती डीश सगळे ब्राह्मणी पदार्थ. उदा. मोदक, पुरणपोळ्या, डाळिंबाची उसळ. मात्र तिला जे पदार्थ आवडतात ते मला आवडत नाहीत. माझे आवडणारे पदार्थ म्हणजे सगळे मांसाहारी पदार्थ, चिकन, मटण, रानडुकराचं मटण इत्यादी.

ती डिस्टर्ब असते तेव्हाशॉपिंगला जाते.

तिच्यासोबतचा अविस्मरणीय क्षण लग्नात मी जेव्हा तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं तो क्षण

तू चुकतोस तेव्हा ती काय करते? – मला माझ्या चुकीची जाणीव करून देते.

दोघांचे भेटण्याचे ठिकाण –  आमचं घर

भांडण झाल्यावर काय करता?- तिचा मूड पूर्ववत होण्याकरिता मी तिच्यासाठी गाणं म्हणतो.

दोघांपैकी जास्त राग कोणाला येतो ? मला

तिचे वर्णन माझ्या शब्दांपेक्षा संदीप खरेंनी खूप छान केलंय ‘नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो.’

तुझी एखादी तिला न आवडणारी सवय माझा बेशिस्तपणा.

avdhoot-gupte