‘दंगल’ची प्रेरणा घेऊन दारावर लावल्या मुलींच्या नेमप्लेट

15

सामना ऑनलाईन। हरयाणा

बॉलीवूड अभिनेता आमिर खान याच्या दंगल सिनेमाची प्रेरणा घेऊन हरयाणातील एका गावातल्या लोकांनी दरवाज्यांवर मुलींच्या नावाच्या नेमप्लेट लावण्याचा धडाकाच सुरु केला आहे. या चित्रपटामुळे मुलींचे महत्व समजल्याचा दावा गावकऱ्यांनी केला असून बेटी बचाओ बेटी बढाओ ही योजना प्रत्यक्षात राबवण्यास सुरुवात केली आहे.

कुस्तीपटू गीता व बबीता फोगट यांच्या हरयाणातील गावा शेजारीच कमोद हे छोटसं गाव आहे. पुरोगामी कमोदमध्ये मुलींवर अनेक निर्बंध आहेत. यामुळे पुरुषांची मक्तेदारी असलेल्या कुस्ती या क्षेत्रात गीता व बबिता फोगट यांनी केलेली कामगिरी बघून प्रेरणा मिळाली आहे. गीता बबीता प्रमाणेच समाजात आपल्याही मुलींची वेगळी ओळख निर्माण व्हावी यासाठी ग्रामस्थ एकवटले आहेत. याचपार्श्वभूमीवर गावक-यांनी घराच्या दरवाजावर घरातील मोठ्या मुलींच्या नावाची पाटी लावण्यास सुरुवात केली आहे. यासाठी पंचायतीनेही सहाय्य करावे,अशी मागणी गावक-यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या