गद्दार बँक अधिकाऱ्यांना जन्मठेप द्या-रामदेव बाबा

नोटाबंदीमुळे मोठा घोटाळा झाल्याचं स्पष्टपणे सांगणाऱ्या बाबा रामदेव यांनी देशासोबत गद्दारी करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे. हिंदुस्थानात नोटाबंदीच्या निर्णयानंतर अनेक ठिकाणी कोट्यवधी रूपये नवीन नोटांच्या स्वरूपात जप्त करण्यात आले आहेत. या घोटाळ्यामध्ये यामध्ये काही बँकांचे अधिकारी सामील असल्याचं समोर आलं होतं.

babaनोटाबंदीच्या निर्णयानंतर बहुसंख्य लोकांना त्रास झाला, रोज कमावून खाणारे पोटापाण्याच्या व्यवस्थेवर पाणी सोडून बँकांबाहेर रांगेत उभे राहतायत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत अशा परिस्थितीत बँकेतील लोकांनी घोटाळे केले, घोटाळेबाजांना मदत केली , या अशा विश्वासघाताची कल्पनाही केली जाऊ शकत नाही असं रामदेवबाबांचं म्हणणं आहे.
नवीन वर्ष सुरू होण्याच्या आधी पैशांसाठीची तंगी दूर होणं गरजेचं आहे असं रामदेव बाबा यांनी म्हटलंय. नोटाबंदी सहन करणाऱ्या जनतेला जर दिलासा मिळाला नाही तर लोकांचा प्रशासनावरचा आणि सरकारवरचा विश्वास उडू शकतो, असं होऊ नये यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे असंही बाबा रामदेव यांचं म्हणणं आहे.