ग्रामीण भागात फुकट पण मर्यादीत इंटरनेट डेटा द्या,ट्रायची सूचना

54

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

नोटाबंदीनंतर केंद्र सरकारने रोकडविरहीत व्यवहारांना चालना मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांना पाठबळ मिळावं यासाठी ग्रामीण भागात फुकट पण मर्यादीत प्रमाणात इंटरनेट डेटा देण्यात यावा अशी सूचना ‘ट्राय’नं म्हणजेच दूरसंचार नियामक प्राधिकरणाने केली आहे. यासाठी जागतिक सेवा कर्तव्य निधीतून मदतही मिळू शकेल असं ट्रायने म्हटलं आहे.

सरकारचे रोकडविरहीत व्यवहारासाठी प्रयत्न आणि इंटरनेटचे परवडणारे दर यामध्ये ताळमेळ बसवण्याची गरज आहे. डिजिटल व्यवहार करायचे असतील तर लोकांना इंटरनेट साक्षर करावं लागेल आणि त्यांना इंटरनेट वापरण्यासाठी प्रोत्साहनही दिलं पाहीजे त्यामुळे ग्रामीण भागात एका महिन्याला १०० एम.बी.पर्यंतचा डेटा फुकट द्यावा असं ट्रायचं म्हणणं आहे.डिजिटल व्यवहारांसाठी इंटरनेट महत्वाचं साधन आहे, त्यामुळे जर ट्रायची ही सूचना मोबाईल कंपन्यांनी अंमलात आणली तर मोबाईलधारकांना नव्या वर्षात मर्यादीत स्वरूपात का होईना पण मोफत इंटरनेट डेटा मिळू शकेल

आपली प्रतिक्रिया द्या