नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मुदत वाढवून देण्याची मागणी

813
प्रातिनिधिक फोटो

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचार बंदी परिस्थितीत बाजार बंद असल्याने, शेतकरी शेतमाल विकू शकत नाही. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर कर्जाची परतफेड करण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने, नियमतीत कर्जाचा भरणा करणाऱ्यांसाठी मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

एक लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी कर्जाची नियमीत परतफेड केल्यास व्याजाची रक्कम भरावी लागत नाही. नियमीत कर्जाच्या रक्कमेचा भरणा करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत असते; परंतू cतसेच बाहेर रस्त्यावर फिरताही येत नाही मग भरणा कसा करायचा बॅंकेत गर्दी करायची नाही. घराबाहेरच पडायचे नाही तर भरणा कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्जाची रक्कम 31 मार्चपर्यंत बँकेत जमा करण्याचा प्रश्न शेतकर्‍यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे नियमीत पीक कर्जाच्या रक्कमेचा भरणा करण्यासाठी शासनाने मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.

अनेक शेतकऱ्यांनी दैनिक सामनाशी बोलताना सांगितले की, आम्ही घराबाहेर पडू शकत नाही कर्जफेड करण्यासाठी पैसे उभे करण्यासाठी माल विकता येत नाही. बाजार बंद आहेत तेव्हा नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मुदत वाढवून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या