मधू दंडवते यांचे नाव सिंधुदुर्ग उपकेंद्राला द्या!

मुंबई विद्यापीठाच्या नव्यानेच स्थापन झालेल्या सिंधुदुर्ग उपपरिसर केंद्राला दिवंगत ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व समाजवादी नेते प्रा. मधू दंडवते यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी युवा सेनेने मुंबई विद्यापीठाकडे केली आहे.

युवा सेनेच्या वतीने यासंदर्भात मुंबई विद्यापीठाला आज निवेदन दिले. राजापूर लोकसभा मतदारसंघ हा पूर्वी सिंधुदुर्ग जिह्याचा मतदारसंघ होता. मधू दंडवते यांनी सतत पाच वेळा त्या मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. केंद्रीय अर्थमंत्रीपदाची धुराही त्यांनी सांभाळली होती. कोकण रेल्वेचे जनक म्हणूनही त्यांना ओळखले जाते असे या निवेदनात म्हटले आहे. युवासेनेचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, शीतल देवरुखकर-शेठ यांनी प्र-कुलगुरू रवींद्र कुळकर्णी यांच्याकडे हे निवेदन दिले. त्याप्रसंगी कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड, अधिष्ठाता डॉ. अजय भांबरे उपस्थित होते अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या