भेंडीबाजारातील रहिवाशांसाठी संक्रमण शिबिरे बांधा, विनोद घोसाळकर यांची सूचना

9

सामना प्रतिनिधी । मुंबई

भेंडीबाजारात समूह पुनर्विकास (क्लस्टर डेव्हलपमेंट) करताना रहिवाशांसाठी संक्रमण शिबिरे बांधण्याच्या सूचना मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी केली.

भेंडीबाजार येथील 16.5 एकर जागेवर सैफी बुऱहाणी अपलिफमेंट ट्रस्टने समूह विकासाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पामुळे सुमारे तीन हजार लोकांना नवीन घरे मिळणार आहेत. या प्रकल्पातील सुमारे 600 रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासाठी ट्रस्टने भेंडीबाजारात 42 मजल्यांचा टॉवर बांधला आहे. यामध्ये रहिवाशांना 300 स्क्वेअर फुटांची घरे दिली जाणार आहेत. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी रहिवाशांसाठी बांधलेल्या इमारतीची पाहणी केली व बांधकामाबद्दल समाधान व्यक्त केले. मात्र सुमारे 300 रहिवासी सहकार्य करीत नसल्याचे ट्रस्टच्या पदाधिकाऱयांनी घोसाळकर यांच्या निदर्शनास आणले. त्यावर डोंगरी इमारत दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी रहिवाशांनी सहकार्य करून सुरक्षित घरांमध्ये स्थलांतर करावे, असे आवाहन घोसाळकर यांनी यावेळी केले. जे रहिवासी घरे रिकामी करीत नाहीत त्यांच्या अडचणी समजावून घेण्यासाठी आपण चर्चा करू असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. या पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांनासाठी बांधलेल्या सदनिकांचा ताबा ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिला जाईल, असे ते म्हणाले. या प्रकल्पातील रहिवाशांसाठी म्हाडा संक्रमण शिबिरे बांधू शकत नाही. त्यामुळे ट्रस्टने संक्रमण शिबिरे बांधण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.