महायुती सरकारवर प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी अनेकदा टीका केली आहे. तसेच अनेकदा आपली नाराजीही व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी अमरावती मतदारसंघातील उमेदवारीनवरून भाजप आणि बच्चू कडू यांच्यातील संघर्ष तीव्र झाला होता. आता त्यांनी राज्यातील अनेक मुद्द्यांवर स्पष्ट शब्दांत आपली भऊमिका व्यक्त केली आहे. तसेच महायुती सरकारच्या लाडका भाऊ योजनेवरही टीका केली आहे.
बच्चू कडू म्हणाले की,सरकारने लाडका भाऊ योजना आणली आहे. सर्वकाही धडधाकट असलेल्या तरुणांना सरकार जादा पैसे देते आणि ज्यांना हातपाय नाही त्यांची एक हजार रुपयांवर बोळवण करते, हे योग्य नाही. राज्य सरकारने केवळ जातीनिहाय आणि मतदारांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजना आणली आहे. त्याने कोणाचाही फायदा होणार नाही, असे स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केले. सरकारने आता ‘लाडका दिव्यांग योजना’ आणि ‘लाडका पत्रकार’ अशी योजनादेखील आणावी, असा टोलाही बच्चू कडू यांनी लगावला.