पंजाबची डुबती नैया मॅक्सवेलच्या हाती

40

सामना ऑनलाईन, मुंबई

आयपीएलच्या आगामी दहाव्या मोसमासाठी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याच्या खांद्यावर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आलेली आहे. मागील दोन मोसमांत किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून निराशाजनक कामगिरी झाल्यामुळे संघव्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे. याआधी डेव्हिड मिलर व मुरली विजय यांच्याकडे या संघाचे नेतृत्व होते.

दरम्यान, इंग्लंडचा यशस्वी कर्णधार इयॉन मॉर्गन व वेस्ट इंडीजचा तारणहार डॅरेन सॅमी हे दोघेही संघामध्ये असतानाही ग्लेन मॅक्सवेल याने अद्याप क्रिकेटच्या एकाही प्रकारात कर्णधारपद भूषवले नसतानाही त्याच्यावर नेतृत्वपदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे हे विशेष. याशिवाय यंदा किंग्ज इलेव्हन पंजाबला दोन ठिकाणी घरचे सामने खेळावे लागणार आहेत. एक पंजाबमधील क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर व दुसरे इंदूर येथील होळकर स्टेडियम.

संघाचा समतोल बिघडला
‘आधी अष्टपैलू मिचेल मार्श आणि आता वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क जायबंदी झाल्याने ऑस्ट्रेलियन संघाचा समतोल बिघडला आहे. त्यामुळे उर्वरित कसोटी मालिकेत याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र संधी मिळालेल्या नव्या दमाच्या खेळाडूंना आपली क्षमता सिद्ध करण्याची हीच संधी होय.’
 मायकल क्लार्क, कर्णधार, ऑस्ट्रेलिया

कमिन्सला संधी मिळण्याची शक्यता
हिंदुस्थान दौऱ्यावर फिरकी गोलंदाजांची कामगिरी लक्षवेधी ठरली असली तरी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने दोन कसोटींत ५ बळी टिपले होते. आता त्याच्या जागेवर शेफिल्ड शील्ड स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारा कॅड सेयर्स, वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा जेसन बेहरन्ड्रॉफ व पॅट कमिन्स यांच्यापैकी कोणाला तरी संधी मिळू शकते. कमिन्सने मागील लढतीत ८ बळी टिपलेले असल्याने त्यालाच संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या