BBL: मॅक्सवेलने केला चमत्कार, अप्रतिम झेल घेतल्यावर स्वत:लाही विश्वास बसेना

glenn-maxwell

Glenn Maxwell Catch: मेलबर्न स्टार्सच्या ग्लेन मॅक्सवेलने बिग बॅश लीग 2021-22 च्या 51 व्या सामन्यात मैदानावर शानदार क्षेत्ररक्षण करत सर्वांना आश्चर्यचकित केले. खरं तर, ब्रिस्बेन हीटविरुद्धच्या सामन्यादरम्यान मॅक्सवेलने फलंदाज सॅम हेझलेटचा असा झेल घेतला, ज्याचे संपूर्ण क्रिकेट जगतातून कौतुक होत आहे. जो कोणी मॅक्सवेलने घेतलेला झेल पाहत असेल, तो कौतुक केल्याशिवाय राहू शकत नाही.

ब्रिस्बेन हीटच्या डावातील 16व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर, हेझलेटने मिड-ऑनला एक जोरदार शॉट मारला, जिथे मॅक्सवेल उभा होता.

चेंडू क्षेत्ररक्षकाला लागून सीमारेषेच्या दिशेने जाईल याची फलंदाजाला खात्री होती. पण तिथेच उभ्या असलेल्या मॅक्सवेलने हवेत उडी मारून झेल घेतला. मॅक्सवेलने एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यात तो यशस्वी झाला. यानंतर जे घडले त्याने चाहत्यांना आणि खुद्द मॅक्सवेललाही चकित केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by cricket.com.au (@cricketcomau)

मॅक्सवेलचा विश्वास बसत नव्हता की त्याने अशक्य गोष्ट पकडली आहे. मॅक्सवेलने तोंडावर हात ठेवून जणू काही स्वप्न पाहिले असेल असे हावभाव केले. त्याचवेळी गोलंदाज कुल्टर-नाईल हाही झेल पाहून आश्चर्यचकित झाला आणि मॅक्सवेलकडे पाहून आश्चर्य व्यक्त करताना दिसला.

दरम्यान, मेलबर्न स्टार्स संघ हा सामना 8 गडी राखून जिंकण्यात यशस्वी ठरला आणि मॅक्‍सवेलला सामनावीराचा किताब देण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना ब्रिस्बेन हीटने 20 षटकांत 6 बाद 149 धावा केल्या, त्यानंतर मेलबर्न संघाने 2 गडी गमावून 150 धावा करून सामना जिंकला. कर्णधार मॅक्सवेलने 30 चेंडूत 37 धावांची शानदार खेळी खेळली. जो क्लार्कने 36 चेंडूत 62 धावा करत मेलबर्नच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.