हिंदुस्थान ‘PARTLY FREE’, अमेरिकेच्या थिंक टँकने ‘फ्रीडम स्कोर’ घटवला

narendra-modi

अमेरिकेच्या वॉशिंगटनमधील थिंक टँकने हिंदुस्थानचा ‘फ्रीडम स्कोर’ डाउनग्रेड म्हणजेच क्रमांक कमी केला आहे. फ्रीडम हाउसच्या क्रमवारीत हिंदुस्थानचा समावेश पहिले ‘FREE’ कॅटेगरीच्या देशांमध्ये होता, मात्र हिंदुस्थानचा क्रमांक घटवून ‘PARTLY FREE’ कॅटेगरीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

या संस्थेने आपल्या अहवालात म्हटलं आहे की, वर्ष 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार आलं आहे तेव्हापासून देशात नागरिकांचं स्वातंत्र्य कमी होऊ लागलं आहे. या अहवालात देशद्रोहाच्या केसचा वापर, मुस्लिमांवर होणारे हल्ले आणि लॉकडाउनच्या दरम्यान लावण्यात आलेल्या प्रतिबंधांमुळे नागरिकांच्या स्वातंत्र्यावर त्याचा परिणाम झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

नव्या रिपोर्टमध्ये हिंदुस्थानचा स्कोर 71 वरून घटवून 67 करण्यात आला आहे. इथे 100 गुण सर्वात मुक्त देशासाठी ठेणण्यात आले आहेत. हिंदुस्थानचा क्रमांक 211 देशांमध्ये 83 हून घसरून 88 व्या स्थानावर आला आहे.

फ्रीडम हाउसने आपल्या वार्षिक अहवालात म्हटले आहे की, “हिंदुस्थानात बहुपक्षीय लोकशाही व्यवस्था आहे, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे सरकार भेदभावावर आधारित निती वापरत आहे, यादरम्यान हिंसक घटना वाढल्या आहेत. विशिष्ट समाज याचा शिकार झाल्याचे यामध्ये म्हटले आहे.”

अहवालात असेही म्हटले गेले आहे की, या सरकारकडून मानवाधिकार संगठनांवर दबाव वाढला आहे, लेखक आणि पत्रकारांमध्ये दहशत निर्माण करण्यात येत आहे, कडवट धार्मिकांकडून प्रेरित होऊन सामूहिक हल्ले होत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या