नितळ चेहरा

49
  • बेसनच्या एक चमचा पिठात दोन चमचे दूध आणि चिमूटभर मीठ घालून पेस्ट करायची. काळ्या डागांवर ही पेस्ट लावायची. १० मिनिटांनी चेहरा स्वच्छ करून घ्यायचा.
  •  लिंबाचा रसही फायद्याचा ठरतो. काळ्या डागांवर लिंबाचा रस चोळून लावायचा. २ मिनिटांनंतर त्यावर मीठ लावून हलक्या हाताने मालीश करायची. ५ मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुऊन टाकायचा.
  • अर्ध्या चमचा दह्यात काळी मिऱ्याची थोडीशी पावडर घालून हे मिश्रण ब्लॅक हेड्सवर हलका मसाज करून लावायचे. १० मिनिटांनी चेहरा धुऊन टाकायचा.
  •  काळ्या डागावर गुलाबजल उत्तम. गुलाबजल आणि मीठ एकेक चमचा घेऊन ते मिश्रण काळ्या डागांवर हलका मसाज करून लावायचे. १० मिनिटांनी चेहरा धुतला की परिणाम जाणवेल.
  • एक चमचा साखर आणि चिमुटभर मीठ एकत्र करून ते ब्लॅक हेड्सवर हलक्या हाताने मालीश करून लावायचे. ५ मिनिटांनी ओल्या फडक्याने साफ केले की फरक दिसेल
आपली प्रतिक्रिया द्या