मऊ… मुलायम… सुंदर…

62

उन्हाळ्यात कोरडय़ा आणि निस्तेज त्वचेचा सामना सगळ्यांनाच करावा लागतो. आयुर्वेदामध्ये त्वचा तेजस्वी, मऊ आणि तजेलदार दिसण्याकरिता काही उपाय सांगितले आहेत. हे उपाय केल्याने तुम्ही हिवाळ्यातही मुलायम आणि सुंदर त्वचेचा अनुभव घेऊ शकता.

* आल्याचे काही तुकडे ठेचून कपभर पाण्यात १० ते १५ मिनिटे उकळवा. दिवसातून ३-४ वेळा हा आल्याचा चहा प्या. या चहामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडायला मदत होईल. रक्ताभिसरण चांगले होऊन तुमच्या त्वचेला ग्लो येईल.

* बटाटा, गाजर, भोपळा अशा फळभाज्यांचे गरम गरम सूप प्या. ज्या पदार्थांमध्ये तुपाचा अंश आहे, असे पदार्थ खा. यामुळे शरीरातील पेशी आणि अवयवांना वंगण मिळेल. तसेच सॅलडस, सँण्डविचेस असे थंड पदार्थ हिवाळ्यात टाळा.

* झोपण्याच्या आधी 1 ग्लास कोमट पाण्यातून त्रिफळा चूर्ण घ्यावे. त्रिफळा चुर्णात आवळ्याचा समावेश असतो. आवळ्यात जीवनसत्त्व क जास्त प्रमाणात असते. यामुळे त्वचा तेजस्वी राहण्यास मदत होते.

* त्वचा दिवसभर मॉइश्चरयुक्त ठेवण्याकरिता दररोज सकाळी अंघोळीपूर्वी तिलाचे तेल कोमट करून चेहरा, हात, पाय यांना मालीश करावे. १५ ते २० मिनिटे हे तेल त्वचेवर राहू द्यावे त्यानंतर अंघोळ करावी.

* दररोज १० मिनिटे रिकाम्यापोटी कपालभाती प्राणायाम करावा. यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.

* दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी सूर्यनमस्कार घालावेत. यामुळे शरीरातील अनावश्यक टॉक्सिन्स बाहेर पडतात. पचनाची समस्या दूर होते. शरीरात उष्णता तयार होऊन चेहरा तजेलदार दिसण्याकरिता नियमित योगासने करणे हा एक उत्तम मार्ग आहे.

आपली प्रतिक्रिया द्या