जीमेल व्हिडीओ स्ट्रिमिंग

93

विविध सोशल नेटवर्किंग साइटस् आणि मेसेंजर्सदेखील व्हिडीओ स्ट्रिमिंगची सेवा देत असताना आता ई-मेल सेवादाते तरी मागे कसे राहतील? ई-मेल सेवादात्यामध्ये अग्रणी असलेल्या जीमेलने आता आपल्या यूजर्ससाठी व्हिडीओ स्ट्रिमिंगची सोय उपलब्ध करून दिली आहे. या फिचरमुळे जीमेल वापरकर्त्यांना आता ई-मेलमध्ये ऍटॅचमेंटद्वारे आलेली व्हिडीओ फाइल ही डाऊनलोड करतानाच स्ट्रिमिंग करून बघता येण्याची सोय मिळाली आहे. याआधी अशा व्हिडीओ फाइल्स या संपूर्ण डाऊनलोड करून मगच व्हिडीओ प्लेअरच्या मदतीने पाहता येणे शक्य होते. यूटय़ूबवर ज्याप्रमाणे कोणताही व्हिडीओ डाऊनलोड न करता पाहणे शक्य आहे, अगदी तशीच सोय गुगलने आपल्या ई-मेल सेवेसाठी दिलेली आहे. गुगलच्या अधिकृत ब्लॉगवरती या फिचरची घोषणा करण्यात आलेली असून थोडय़ाच कालावधीत जगभरातील सर्वच जीमेल वापरकर्त्यांना या फिचरची सोय टप्प्या टप्प्याने देण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या