गोव्यात मिग-२९ लढाऊ विमानाला आग

सामना ऑनलाईन । पणजी

उड्डाण करण्यासाठी धावपट्टीवरुन वेगाने जात असताना मिग-२९ लढाऊ विमान घसरले. या घटनेनंतर विमानाला आग लागली. अग्निशमन दलाने आग लगेच विझवली आणि शिकाऊ वैमानिक विमानातून सुखरुप बाहेर आला. ही घटना गोव्यात घडली.

विमानाला झालेल्या अपघातामुळे गोव्याच्या विमानतळाची धावपट्टी तासभर विमान वाहतुकीसाठी बंद करण्यात आली होती. सुदैवाने दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या