गोव्यात बीफ बक्कळ आहे! कमी पडले तर आयात करू

15

सामना ऑनलाईन । पणजी

देशभरात गोवंशहत्याबंदीसाठी भाजपकडून आग्रही भूमिका मांडली जात असतानाच गोव्यात मात्र भाजपचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी उलट भूमिका घेतली आहे. गोव्यात गोमांस बक्कळ असून तुटवडा निर्माण झाला तर इतर राज्यांमधून त्याची आयात करू, असे खळबळजनक विधान पर्रीकर यांनी केले आहे.

गोव्यात दररोज दोन हजार किलो गोमांस बाजारपेठेत उपलब्ध होते. याशिवाय इतर राज्यांमधूनही गोव्यातील कत्तलखान्यांमध्ये जनावरे आणण्यास सरकारने बंधन घातलेली नाही, असे पर्रीकर म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या