गोवा; रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – काँग्रेस

408

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वाढदिवसानिमित्त रुग्णाची सेवा करून फक्त जाहिरात बाजी केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यांच्या या जाहिरातबाजीमुळे रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचा आरोप करत गोवा प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

आपण वाढदिवस साजरा करणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. या दिवशी मुख्यमंत्र्यानी म्हापसा येथिल सरकारी आझिलो रुग्णालयाला भेट दिली व रुग्णांची तपासणी केली. मात्र त्यांनी दहा वर्षापूर्वीच वैद्यकीय व्यवसाय सोडला असल्याने त्यांनी रुग्णाची अशा प्रकारे तपासणी करणे अयोग्य असल्याचे अमरनाथ पणजीकर म्हणाले आहेत. तसेच या रुग्णालयाला भेट देताना त्यांच्यासोबत मंत्री मायकल लोबो आणि इतर अधिकारीही हजर होते. या सर्वांनी तेथे शारिरीक अतंरही पाळलेलं नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या