गोवा : पर्यटनमंत्री आजगांवकरांसोबत सेटींग करून पर्यटक गोव्यात येतायत, काँग्रेसचा गंभीर आरोप

433

गोवा काँग्रेसने तिथल्या पर्यटनमंत्र्यांवर गंभीर आरोप केला आहे. गोव्यात हजारो पर्यटक बाबू आजगावकरांकडे सेटिंग करुन वास्तव्यास येत आहेत असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे. आजगावकर हे ‘आपले मिशन 30 टक्केचे धोरण’ नुसार काम करत असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे. आजगांवकर यांना त्यांचे कमिशन न मिळाल्यानेच त्यांनी कार्निव्हल 2020 च्या अनेक बक्षिस विजेत्यांची रक्कम अडवून ठेवली आहे असंही पणजीकरांनी म्हटलं आहे.

पणजीकरांनी गोव्याच्या पर्यटनमंत्र्यांवर सणसणीत आरोप करताना म्हटले की ‘आज गोव्यात हजारो पर्यटक बाबू आजगावकरांकडे सेटिंग करुन वास्तव्यास येत आहेत. त्यांच्या आशिर्वादाने बेकायदा चालू असलेल्या हॉटेल्स व होम स्टे मध्ये ते राहात आहेत. यातील अनेकांना कोरोनाची लागण झालेली असू शकते आणि ते संपूर्ण गोव्याचा सर्वनाश करतील.’ गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी या प्रकाराची त्वरीत याची दखल घ्यावी अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या