गोवा – विजेचे खांब घेऊन जाणारा ट्रक उलटला, 4 कर्मचारी ठार

639

बोरी सर्कलच्या जवळील उतरणीवर वीज खांब घेऊन जाणारा ट्रक उलटून झालेल्या भीषण अपघातात वीज खात्याचे 4 कर्मचारी ठार झाले; तर इतर 3 कर्मचारी जखमी झाले. हा अपघात इतका भीषण होता की तिघा कर्मचार्‍यांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.

गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास बोरी येथील सर्कलच्या उतरणीवर हा अपघात झाला. विजेचे खांब आणण्यासाठी कर्मचारी वीज खात्याचा ट्रक घेऊन सकाळी मडगाव येथे गेले होते. ट्रकमध्ये 9 कर्मचारी असल्याचे सांगितले जात आहे. बोरीच्या सर्कलच्या वळणावर सावर्डेचा रस्ता जुळतो त्याच ठिकाणी समोरून येणार्‍या दुचाकीला वाचवताना चालक प्रदोष नाईक यांचा ट्रकवरील ताबा सुटून ट्रक पलटी झाला. या अपघातात अवजड असे विजेचे खांब अंगावर पडल्याने तीन कर्मचारी जागीच ठार झाले. एका कर्मचार्‍याचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.

अपघाताचे वृत्त समजताच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये धाव घेतली. जखमींवर केल्या जाणार्‍या उपचाराची माहिती त्यांनी घेतली.

आपली प्रतिक्रिया द्या