फोंडयातील मदरशात लपून बसलेल्या तबलिकी जमातच्या 9 जणांची क्वारंटाइन केंद्रात रवानगी

753
फोटो- प्रातिनिधीक

फोंडयातील सिल्वानगर मधील फातिमा मदरशात लपून बसलेल्या मूळ गुजरात येथील तबलिकी जमातच्या 9 संशयितांना शोधून काढून त्यांची रवानगी मये रेसिडेन्सी मधील क्वारंटाईन सेंटरमध्ये करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फोंडा पोलीस व मडगाव येथील आरोग्य केंद्राच्या पथकाने काल बुधवारी उशिरा रात्री ही कारवाई केली.

उपलब्ध माहितीनुसार सर्व नऊ संशयित दिल्लीहून 20 मार्च रोजी केरळमार्गे गोव्यात दाखल झाले होते. सर्वांनी निझामुद्दिन दिल्ली येथे झालेल्या तबलीकी जमातच्या मरकजला उपस्थिती लावल्याची शक्यता आहे. सर्व संशयित 20 ते 55 वयोगटातील असून मागील 12 दिवसांपासून फातिमा मदरशात लपून बसले होते. निजामुद्दिन येथे तबलीकी जमातीच्या जुलुसास उपस्थित असलेल्या सहा जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर देशभरात पसरलेल्या संशयितांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे.

गोव्यात सापडलेले नऊ ही जण गोव्यात दाखल होण्यापुर्वी धार्मिक प्रचार करण्यासाठी गेल्याचे सांगितले जात असून ते अनेकांच्या संपर्कातही आले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या सर्वांच्या कोरोनासंदर्भातील रिपोर्टकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या