नारळाच्या झाडाला गोव्यात राज्य वृक्षाचा दर्जा!

55

सामना ऑनलाईन । मुंबई

गोवा राज्याची ओळख असलेल्या माडाला म्हणजेच नारळाच्या झाडाला ‘राज्य वृक्षा’चा दर्जा देण्यात आला आहे. गोवा सरकारच्या नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नारळाच्या झाडाला राज्य वृक्षाचा दर्जा देण्याच्या कायद्याला मंजुरी देण्यात आली. गोव्याचे कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी याविषयीची घोषणा केली. यापुढे कल्पवृक्ष म्हणून मानल्या जाणाऱया नारळाच्या झाडाला गोव्यासह दीव-दमणच्या राज्य वृक्षाचा दर्जा दिला जाणार आहे. वृक्ष कायदा 1984 मध्ये तसा बदलही करण्यात येणार असल्याचे सरदेसाई यांनी स्पष्ट केले. गोवा फॉरवर्ड पक्षाने नारळाच्या झाडाला राज्य वृक्षाचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले होते. नारळाच्या झाडाला वनक्षेत्रातून वगळून त्याचा समावेश कृषी क्षेत्रात करण्यासही गोवा सरकारने मान्यता दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या