बलात्कार प्रकरण: तरुण तेजपाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून झटका, याचिका फेटाळून लावली

703

‘तहलका’चे माजी एडिटर इन चीफ (मुख्य संपादक) तरुण तेजपाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने तेजपाल यांची कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली आहे. तेजपाल यांच्या विरोधात लैंगिक शोषणाचा खटला सुरू आहे. तसेच गोव्याच्या कनिष्ठ न्यायालयात सुनावणीवरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने हटवली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या कनिष्ठ न्यायालयाने 6 महिन्यांत खटल्याचे कामकाज पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. तेजपाल यांच्यावर महिला सहकाऱ्यावर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचा आरोप ठेवण्यात आला आहे. 2017 मध्ये गोवा येथील कनिष्ठ न्यायालयाने तेजपाल यांच्यावर बलात्कार आणि लैंगिक शोषणांच्या कलमांखाली आरोप निश्चित करण्यात आले होते. ज्या विरोधात तेजपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत त्याला आव्हान दिले होते.

आपली प्रतिक्रिया द्या