गोवा शिपयार्ड लिमिटेडचे जनसंपर्क अधिकारी निखिल वाघ यांना मानाचा पुरस्कार

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत गोवा शिपयार्ड लिमिटेड या कंपनीचे जनसंपर्क अधिकारी निखिल मुकुंद वाघ यांना नवी दिल्ली येथे “प्रॉमिसिंग पीआर पर्सन ऑफ द इयर” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पब्लिक रिलेशन काऊन्सिल ऑफ इंडियाच्या दिल्लीत पार पडलेल्या एका कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला. संरक्षणविषयक संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष आणि खासदार जुआल ओरम यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला असून यावेळी पर्यटन विभागाचे माजी सचिव विनोद झुत्शी , पीआरसीआयचे मुख्य मार्गदर्शक जयराम आणि पीआरसीआयच्या राष्ट्रीय अध्यक्ष गीता शंकर यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.

जनसंपर्क क्षेत्र, कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि माध्यम व्यावसायिकांच्या उपस्थितीत वाघ यांना हा पुरस्कार देण्यात आला. मुळच्या बार्शीच्या असलेल्या वाघ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर, येथून जनसंवादाची पदवी घेतली आहे. लोकमत आणि एबीपी माझामध्ये काम केल्यानंतर त्यांनी 2011 मध्ये गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL) चे PRO- जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. वाघ यांनी काळाची पावले ओळखत गोवा शिपयार्डला सगळ्या सोशल मीडिया मंचांवर आणले असून त्यामुळे गोवा शिपयार्डचे काम लाखों लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे.