बकरीवर 5 जणांनी बलात्कार केला, मुक्या जनावराच्या मृत्यूमुळे इम्रान खान ट्रोल

पाकिस्तानात एक लाजिरवाणी आणि किळसवाणी घटना घडली आहे. पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील ओकारा शहरात एका बकरीवर सामूहीक बलात्कार करण्यात आला. बकरीवरील अत्याचारामुळे तिचा मृत्यू झाला. बकरी मालकाने सतगारा पोलीस ठाण्यात नईम, नदीप, रब नवाज आणि अन्य दोघांविरोधात पोलीस तक्रार केली होती, जिच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवत या 5 जणांना अटक केली आहे.

बकरीच्या मालकाने म्हटलंय की आरोपी बकरीला घेऊन सुनसान जागी गेले होते. तिथे त्यांनी आळीपाळीने बकरीवर बलात्कार केला. मालक जेव्हा त्याची बकरी शोधत या जागी पोहोचला तेव्हा आरोपी तिथून पळून गेले होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना पकडलं आणि त्यांची नीट चौकशी केली. यावेळी त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. ही घटना पाकिस्तानातील प्रसिद्धी माध्यमांनी प्रकाशझोतात आणताच संतप्त प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत. या घटनेनंतर अनेकांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना ट्रोल केलं आहे. काही दिवसांपूर्वी इम्रान यांनी महिलांच्या बाबतीत एक अत्यंत लाजिरवाणं विधान केलं होतं. त्यांच्या याच विधानावरून त्यांना ट्रोल करण्यात येत आहे.

इम्रान खान यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की लैंगिक शोषण हे पाश्चिमात्य आणि हिंदुस्थानी संस्कृतीतून आलेल्या अश्लीलतेमुळे होतं. इम्रान यांनी महिलांनी बुरखा घालायला हवा कारण त्याने प्रलोभन नियंत्रित करता येतं असंही म्हटलं होतं. त्यांच्या याच विधानामुळे पाकिस्तानातील अनेक मंडळी आणि खासकरून महिला संतापल्या आहेत. सोशल मीडियावरून या सगळ्यांनी इम्रान खान यांना सडकून काढायला सुरुवात केली आहे. क्रिकेटपटू वसीम अक्रम याची बायको शानिएरा खान हिने एक इन्स्टाग्राम पोस्ट लिहिली आहे. यात तिने म्हटलंय की ‘उद्या आरोपी म्हणतील की ही सगळी चूक बकरीची होती कारण ती मादी होती, एकटी होती आणि तिनेच इशारे खाणाखुणा केल्या होत्या. शिवाय तिने स्वत:ला वस्त्रांनी झाकलंही नव्हतं’

डॉन न्यूजने मॉडेल आणि अभिनेत्री मथिरा हिला या घटनेनंतर प्रतिक्रिया विचारली होती. यावर ती म्हणाले की आता जनावरांनी पण आता शोषणापासून बचावासाठी कपडे घालावेत का ? एका व्यक्तीने ट्विटरवर लिहिलं आहे की ही बकरी धड कपड्यांमध्ये इकडेतिकडे फिरत होती म्हणून हे 5 रोबोट पेटले होते

दुसऱ्या एका व्यक्तीने म्हटलंय की ‘इथेही पर्दा सिस्टम लागू आहे काट

आपली प्रतिक्रिया द्या