अमेरिकेत बकरी झाली महापौर

80

सामना ऑनलाईन। न्यूयॉर्क

अमेरिकेतील वर्मोन्ट येथील फेयर हेवन शहरात महापौरपदी एका बकरीची निवड करण्यात आली आहे. एका पाळीव प्राण्याला महापौर बनवण्याची ही जगातली पहिलीच घटना आहे. नूबियन जातीची या बकरीचे नाव लिन्कोन असून ती अवघी 3 वर्षांची आहे. नागरिकांनी लिन्कोनला भरघोस मतं दिली होती.

मंगळवारी लिन्कोनने महापौरपद स्वीकारले. महापौरपदाच्या स्पर्धेसाठी 16 पाळीव प्राण्यांना निवडणुक रिंगणात उभे करण्यात आले होते. यात कुत्रा व मांजरांचाही समावेश होता. यात सगळ्यांना मागे टाकत लिन्कोन 13 मतांनी विजयी ठरली. तर 10 मतं मिळवलेल्या सैम्मी नावाच्या कुत्र्याला उप महापौरपद देण्यात आले आहे. फेयर हेवन शहराची लोकसंख्या 2500 असून येथे महापौरपद प्राण्यांना देण्याची प्रथा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या