देव आणि दैव दोन्ही मानतो

138

गेली अनेक वर्षे निर्मम वृतीने संगीत साधना करणारे मिलिंद इंगळे स्वरांच्या माध्यमातूनच ईश्वरपूजा करतात.

देव म्हणजे? – न दिसणारी, अनुभवता येणारी शक्ती

आवडते दैवत? – आवड-निवड नाही करता येत.

धार्मिक स्थळ? – कोलकात्यातील स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंसांचं मंदिर.

आवडती प्रार्थना? – शुभंकरोती कल्याणम् …

आवडते देवाचं गाणं? – ‘इतना तो करना स्वामी…’

दैवी चमत्कारांवर विश्वास आहे का? – हो दैवावर विश्वास आहे, म्हणून दैवी चमत्कारांवर पण विश्वास आहे. देव आणि दैव या दोन्हीवर माझा विश्वास आहे.

आवडता रंग? –  मरून आणि पांढरा.

देवावर विश्वास आहे? – हो.

दुःखी असतोस तेव्हा? – गाणी ऐकतो.

नास्तिक लोकांबद्दल काय सांगशील? – प्रत्येकजण आपापल्या दृष्टीने बरोबर असतो. त्यामुळे आपण त्यांना दोष देऊ शकत नाही.

देवभक्त असावं, पण देवभोळं नसावंतुमचं मत?- देव ही शक्ती मानली तर आपल्या कृतीला ती सहाय्य करण्यासाठी असावी.

इच्छा पूर्ण होण्यासाठी नवस करता का? – माझ्यासाठी नाही. एकदाच अमिताभसाठी केला होता. ते बरे झाले तर शेगावला जाण्याचा. तो मी पूर्ण केला.

संगीत कला आणि भक्तीची सांगड कशी घालता? – भावगीत, सिनेसंगीत याकडे माझा जास्त कल असतो, पण जेव्हा मी भक्तिसंगीत गातो तेव्हा मी अभ्यास करून कशा तऱहेने भक्तीपर गाणी गाता यायला हवीत, त्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत हे अभ्यासून मी गाणी गातो.

मूर्तिपूजा महत्त्वाची वाटते की प्रार्थना? – प्रार्थना.

आपली प्रतिक्रिया द्या