गोदावरी नदीने जायकवाडीला दिले 136 दिवसात 53.62 टीएमसी पाणी, साडेबारा हजार क्युसेकने विसर्ग सुरू

यंदाच्या पावसाळी हंगामात पर्जन्यमान उशीराने झाले. त्यामुळे उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणे भरतील की नाही ही चिंता होती. पण वरूणराजाने यंदा शेतक-यांसह सर्वांनाच पावसाने चिंब चिंब करून टाकले. धरणे काठोकाठ भरली अन् समन्यायीची चिंता असलेल्या मराठवाडयातील जायकवाडीला 1 जून पासून साडेचार महिन्यांत 53.62 टीएमसी पाणी झेपावले. 13 ऑक्टोंबर रोजी झालेल्या पावसाची आकडेवारी मिलीमिटर मध्ये पुढीलप्रमाणे तर कंसातील आकडेवारी आजपर्यंत एकूण झालेल्या पावसाची आहे. सोमवारी सकाळी नऊ वाजता नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीत बारा हजार पाचशे वीस क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता.

दारणा 0 (1535), मुकणे 0 (१५८८), वाकी 13 (2469), भाम 0 (3391), भावली 60 (4323), वालदेवी 0 (992), गंगापुर 0 (1623), काश्यपी 2 (1384), गौतमी 0 (1694), कडवा 0 (799), आळंदी 2 (1003), पालखेड 9 (517), करंजवण 10(857), ओझरखेड 15 (955), वाघाड 5 (985), नांदुर मध्यमेश्वर 6(513), नाशिक 0 (1058), घोटी 0 (1706), ईगतपुरी 23 (3595), त्रंबकेश्वर 4(2445), देवगांव 24 (659), ब्राम्हणगांव 20 (713), कोपरगांव 12(576), पढेगांव 13 (638), सोमठाणे 0 (407), कोळगांव 32 (638), सोनेवाडी 12 (417), शिर्डी 5 (658), राहाता 1 (494), रांजणगांव खुर्द 3 (564), चितळी 22 (533), याप्रमाणे पाउस झाला आहे.

धरणांतील पाणीसाठा टक्के, तर कंसातील आकडे उपलब्ध पाणी दशलक्ष घनफुटमध्ये पुढीलप्रमाणे. दारणा 100 टक्के (७१४९ दलघफु), मुकणे 98 टक्के (7097) वाकी 100 टक्के (2492), भाम 100 टक्के (2464), भावली 100 टक्के, (1434), वालदेवी 100टक्के (1133), गंगापुर 100 टक्के (5630), काश्यपी 100टक्के (1852), गौतमी 100 टक्के (1868), कडवा 99 टक्के (1678), आळंदी 100 टक्के (816), पालखेड 98 टक्के (642), करंजवण 100 टक्के (5371), ओझरखेड 100 (2130), वाघाड 100 टक्के (2302), असा पाणीसाठा आहे. धरणे पूर्ण भरल्याने जायकवाडीच्या समन्यायी पाण्याची चिंता मिटली आहे.